राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येईल…

2

देवेंद्र फडणवीस; तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा टँकर मुक्त करणार…

कणकवली/अमोल टेंबकर ता.१७: राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता येईल आणि पुन्हा एकदा आभार मानण्यासाठी “मी” सिंधुदुर्ग जिल्ह्यात येईन,फक्त येथील लोकांनी मला आशीर्वाद द्या,असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे आयोजित महाजनादेश यात्रे प्रसंगी बोलताना केले.दरम्यान राज्य शिक्षणात आणि उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा पुढच्या तीन वर्षात टँकर मुक्त करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी यावेळी विनोद तावडे,गिरीश महाजन,आशिष शेलार,रविंद्र चव्हाण,प्रसाद लाड,सुरजितसिंग ठाकुर,प्रविण दरेकर,कीरीट सोमय्या,निरंजन डावखरे,प्रमोद जठार,राजन तेली,अजित गोगटे,नंदू घाटे,संदेश पारकर,राजन म्हापसेकर,अन्नपूर्णा कोरगावकर,स्नेहा कुबल,मनोज नाईक,महेश सारंग आदी उपस्थित होते.

10

4