Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळच्या तहसीलदार पदाचा आर.व्ही.नाचणकर यांनी स्विकारला कार्यभार...

कुडाळच्या तहसीलदार पदाचा आर.व्ही.नाचणकर यांनी स्विकारला कार्यभार…

कुडाळ ता.१७: येथील तहसीलदार म्हणून आर.व्ही.नाचणकर यांनी आज तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला.श्री.नाचणकर हे यापूर्वी उपविभागीय अधिकारी (महसूल) रत्नागिरी या कार्यालयात नायब तहसीलदार (शिरस्तेदार )म्हणून कार्यरत होते.
त्यांची पदोन्नतीने कुडाळ तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेली आहे यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे मच्छिंद्र सुकटे याची बीड जिल्ह्यात
उपजिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन अधिकारी )निवड झाल्याने तहसीलदार पद काही दिवस रिक्त होते श्री नाचणकर यांनी आज या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांचे तहसील कार्यालय कुडाळ च्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले यावेळी महसूल नायब तहसीलदार श्रीमती दर्शना चव्हाण चंद्रकांत म्हैसकर पंकज मांजरेकर अमोल बिडीये निलेश वेरुळकर प्रभाकर शेळके नेत्रा मयेकर सुमित राणे नरेंद्र एडके प्रवीण मोंडे परमेश्वर रहाटे मंगल केळजी श्रीमती श्रद्धा टिटवे श्रीमती मनीषा खानोलकर श्रीमती हेमा तोरस्कर श्रीमती प्रियाणी काळसेकर कर्मचारी आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments