कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे स्वाभिमान पक्षाकडून स्वागत

2

लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची नारायण राणेंची ग्वाही

कणकवली, ता.17 ः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. स्वाभिमान पक्ष कार्यालयाजवळ हा स्वागत सोहळा झाला. यानंतर श्री.राणे यांनी आपला भाजप प्रवेश लवकरच मुंबईत होईल अशी ग्वाही दिली. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे हेच भाजपचे उमेदवार असतील असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
येथील स्वाभिमान कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास असून आपला भाजप प्रवेश लवकरच होईल. तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आपला मुलगा आमदार नितेश राणे यालाच मिळणार आहे. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करताना आम्ही कोणत्याही मागण्या ठेवलेल्या नाहीत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काय ते पाहू. सगळ्या गोष्टी त्यावेळी होतील असे श्री.राणे म्हणाले. तसेच आजच्या भाजपच्या जाहीर सभेला निमंत्रण असते तर निश्‍चित गेलो असतो असेही सांगण्यास राणे विसरले नाहीत. तर शिवसेनेचा विरोध असो अथवा नसो आपला भाजप प्रवेश निश्‍चित आहे असेही राणे म्हणाले.

17

4