सावंतवाडीच्या सुपुत्राचे स्पर्धा परीक्षेत यश…

2

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदी निवड…

सावंतवाडी ता.१८: येथील सुपुत्र पराग मातोंडकर यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून,त्यांची नियुक्ती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून झाली आहे.सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले असून,कोणतेही खाजगी क्लासेस न घेता त्यांनी स्वयंअध्ययनातून हे यश मिळवले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१७ मध्ये घेतलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक (AMVI) परीक्षेत उत्तीर्ण होऊन श्री.मातोंडकर या युवकाने विशेष कामगिरी बजावली आहे.महाराष्ट्रातील ७०००० युवकांमधून निवड होऊन ते ४६६ रँक ने उत्तीर्ण झाले. ही निवड मध्यंतरी समांतर आरक्षण व अन्य कायदेशीर प्रक्रियेत दीड वर्षे अडकली होती.पण सर्वोच्य न्यायालयाचा आदेशाने परत ही प्रक्रिया सुरु झाली असून ते लवकरच कामावर रुजू होणार आहेत.
त्याचे शालेय शिक्षण सांगेली highschool येथे झाले आहे.श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे त्यांनी बारावी चे शिक्षण पूर्ण केले आणि gharda institute of technnolgy, lavel, khed येथे त्याने mechanical या शाखेत आपली पदवी पूर्ण केली.त्यानंतर काही वर्षे खासगी कंपनी मध्ये नोकरी केली.
श्री.मातोंडकर यांनी सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्याने पुणे गाठले.कोणतेही खासगी classes न लावता स्वअध्ययनाने त्याने हे सुयश मिळवले.त्याचे वडील भगवान मातोंडकर कोल्हापूर येथे शिक्षक असून,आई निवृत्त वैद्यकीय कर्मचारी आहे तसेच वकील सुभाष मातोंडकर हे त्यांचे बंधू आहेत.
या यशाचे श्रेय पुणे व मुंबई स्थित मित्र गणेश खाडे, दिनेश पवार, केदार दामले, श्रद्धा जोशी, नयन राठोड, कपिल देव, दिनेश राहाटे, अंकिता भिंगार्डे, स्नेहा पाटील, अजिंक्य जोशी याना आणि आपल्या परिवारातील बहीण व आईवडील यांना दिले आहे असे श्री.मातोंडकर यांचे म्हणणे आहे.

0

4