आता…नारायण राणेंची नाणार बाबत भूमिका काय…?

2

 

जयेंद्र परूळेकर:धीरज परब, सिध्देश परब यांच्यावर झालेली कारवाई चुकीची

 

सावंतवाडी ता 18
राणे भाजपात जाण्यास इच्छूक आहेत,परंतू त्यांनी यापूर्वी विरोधात भूमिका घेतलेल्या नाणार प्रकल्पाबाबत त्यांची भूमिका काय असा प्रश्न काॅग्रेंसचे प्रवक्ते डाॅ.जयेद्र परूळेकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री दौ-याचे कारण सांगून मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब,काॅग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सिध्देश परब आणी वकील सुहास सावंत यांना स्थानबध्द करून सत्ताधा-यांनी रडीचा डाव खेळला. त्याचा आपण जाहीर निषेध करीत आहोत असे ही त्यांनी सांगितले
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी तालुकाध्यक्ष रविद्र म्हापसेकर,कार्याध्यक्ष सिध्देश परब,इर्शाद नाईक,संतोष जोईल आदी उपस्थित होते.

यावेळी श्री परुळेकर म्हणाले नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दौ-यात आपण लवकरच भाजपात प्रवेश करणार आहोत असे जाहीर केले आहे. परंतु यापूर्वी नाणार प्रकल्पाबाबत राणे यांनी वेळोवेळी विरोधी भूमिका घेतली होती, आंदोलन केले होते.आता मात्र ते भाजपच्या वाटेवर आहेत त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत आता त्यांची भूमिका काय असेल ते त्यांनी जाहीर करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी येथील सभेत पुन्हा त्याच ठिकाणी नाणार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.त्यामुळे निवडणूका झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठीकाणी प्रकल्प आणण्यासाठी हालचाली होतील अशी शंका आहे.हे धोकादायक आहे.
ते पुढे म्हणाले जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मनसेचे नेते धीरज परब,काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांच्यासह मराठा समाजाचे नेते सुहास सावंत यांच्यावर कारवाई करण्यात आली ही चुकीची आहे. त्यांच्याकडून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न होता गड-किल्ल्यांचे संदर्भात देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णया विरोधात त्यांची भूमिका होती अशा वेळी त्यांना विरोध न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे या प्रकाराचा आपण निषेध करीत आहे.

2

4