आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त

2

वैभववाडी.ता,१८: महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास आयएसओ ९००१/२०१५ मानांकन मिळाले आहे. या मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्थरातून महाविद्यालयाचे कौतुक केले जात आहे.
या मानांकनाची वैधता २०२२ पर्यंत आहे. सदर मानांकन हे आंतरराष्ट्रीय कॉलिटी सर्टिफिकेशन सर्विस यु. के यांचे कडून देण्यात आले आहे. २०२० व २०२१ मध्ये पुन्हा महाविद्यालयाचे ऑडिट होणार आहे. महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून पदवी शिक्षणाची सोय आहे. या शैक्षणिक वर्षात एम. ए. इंग्रजी, एम. कॉम ,( एम. एससी रसायनशास्त्र ) मधील पदव्युत्तर पदवी चे वर्ग सुरू केले आहेत. यूजीसीचे २ f व १२ (b) चे स्टेटस महाविद्यालयास मिळाले असून महाविद्यालयात भव्य इनडोअर स्टेडिअम उभारण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. सदर आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्राचार्य डॉक्टर सी. एस. काकडे, ग्रंथपाल किशोर वाघमारे व अधीक्षक संजय रावराणे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

58

4