केसरकरांनी चांदा ते बांदा योजनेतून अघोरी विद्यापिठ सुरू करावे…

2

परशुराम उपरकर यांचा टोला; राणेंना मुख्यमंत्र्यांची वाट पहावी लागणे हे दुर्दैव…

सावंतवाडी ता.१८: निवडणुकीच्या तोंडावर विविध विकास कामांची उद्घाटने करून घोषणा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेमधून सावंतवाडीत अघोरी विद्या विद्यापीठ सुरु करावे,अशी खिल्ली मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे उडवली.दरम्यान राज्याचे नेतृत्व करणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रस्त्यावर राहून तब्बल चार तास वाट पाहावी लागते हे दुर्दैव आहे.अशी टीकासुद्धा त्यांनी यावेळी केली.आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी श्री.उपरकर पुढे म्हणाले,केसरकर यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे बबन साळगावकर यांनी केसरकर यांच्या काळया जादूची पोलखोल केली आहे. ते जादूटोणा आणि काळी जादू करतात असा आरोप आहे.साळगावकर हे केसरकर यांचे अत्यंत जवळचे आहेत.त्यामुळे त्यांच्या बाबत त्यांना सर्वाधिक माहिती आहे.केसरकारांचे सद्यस्थितीत तावीज,काळे दोरी घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.हा सर्व प्रकार लक्षात घेता केसरकरांनी आता सावंतवाडी शहरात चांदा ते बांदा या योजनेतून “अघोरी विद्ये”चे विद्यापीठ उभारावे आणि त्या विद्यापीठात बंगाली जादू,काळी जादू,अघोरी विद्या असे वेगळे अभ्यासक्रम सुरू करावेत.त्याठिकाणी देशातील व जगातील अनेक राजकारणी अभ्यास करण्यासाठी येतील अशी खोचक त्यांनी टीका केली.चांदा ते बांदा योजने मधून घोषणा करण्यात आलेल्या विविध प्रकल्प, चष्म्याचा कारखाना,सेट-टॉप-बॉक्स,रोजगाराच्या संधी हे सर्वकाही गायब झाले आहे.त्यांना फक्त घोषणा पलीकडे काही जमले नाही असा आरोप यावेळी उपरकर यांनी केला.

यावेळी नारायण राणेंवर त्यांनी टीका केली राज्याचे प्रमुख म्हणून एकेकाळी जबाबदारी स्वीकारणाऱ्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यासाठी एखाद्या तिठ्यावर साडेचार तास घालवणे योग्य नाही.हे त्यांच्या पदाला शोभत नाही हे आमचे दुर्दैव आहे,असे ते म्हणाले.यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवडे अशिष सुभेदार अतुल केसरकर आदी उपस्थित होते.

4

4