विधानसभा निवडणुकी संदर्भात वेंगुर्ले तालुका व शहर राष्ट्रवादीची महत्त्वाची सभा…

2

वेंगुर्ले ता. १८: तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची सभा शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता म्हाडा-वेंगुर्ले येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत उपस्थित राहुन निवडणुकी संदर्भात आढावा घेणार आहेत.

सदर सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रान्तिंक सदस्य एम.के. गावडे,ओ.बी.सी सेलचे जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब कनयाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ नम्रता कुबल आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असून तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व सेल चे अध्यक्ष, बुथ अध्यक्ष यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन सत्यवान साटेलकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वेंगुर्ले यांनी केले आहे.

14

4