सावंतवाडी कारागृहातील अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात…?

2

उपरकरांची जिल्हा न्यायाधिशांकडे तक्रार; नियमबाह्य सुविधासह,पैसे घेतल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.१८: कारागृहात असलेल्या बंदिवानांना भेटण्यासाठी पैसे घेतले जातात,नियमबाह्य सुविधा दिल्या जातात आदी कारणावरून येथील कारागृहातील अधिकारी वादात सापडण्याची शक्यता आहे.याबाबतची तक्रार मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे केली आहे.आवश्यक असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासावेत,अन्य पुरावे आपल्याकडे आहेत,असा त्यांनी दावा केला आहे.
याबाबतची माहिती श्री.उपरकर यांनी माहीती दिली.ते म्हणाले आपण याबाबत लेखी तक्रार केली आहे.यात त्यांनी असे म्हटले आहे की,वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीदरम्यान २०११ मध्ये झालेल्या राजकीय राड्यात आपल्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.त्या हल्ल्यातील संशयितांना शिक्षा सुनावण्यात आली.मात्र संशयितांना तात्काळ सेंट्रल जेल मध्ये पाठविणे गरजेचे असताना सावंतवाडी कारागृहात असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना विशेष सुविधा दिल्या,तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठी पैसे घेतले,घरगुती जेवण दिले,असे आरोप केले आहेत.तसेच या सर्व प्रकारांची चौकशी करण्यात यावी,यासाठी आवश्यक असलेले कारागृहाचे सीसीटीवी फुटेज तपासण्यात यावेत व संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करुन कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली आहे.

13

4