Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याझाराप जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानला धक्का...

झाराप जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानला धक्का…

आमदार वैभव नाईकांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

कुडाळ ता.१८: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी झाराप जिल्हा परिषद विभागात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का दिला आहे.झाराप जिल्हा परिषद विभागातील तेरसेबांबर्डे गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रामराम करीत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.
तेरसेबांबर्डे काजराळवाडी येथे मंगळवारी रात्री हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जि.प.सदस्य राजू कविटकर, माजी जि.प.सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, झाराप विभाग प्रमुख बबन बोभाटे, झाराप सरपंच सौ. स्वाती तेंडोलकर, आकेरी शाखाप्रमुख महेश जामदार, तेरसेबांबर्डे शाखाप्रमुख अमित बाणे, उपशाखाप्रमुख मंगेश परब, अमित साळगांवकर, माजी सरपंच सुधीर मेस्त्री, अशोक बांबर्डेकर, शंकर मांजरेकर, उदय बांबर्डेकर आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना.दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. या विकासकामांवर प्रेरीत होऊन या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विभाग प्रमुख बबन बोभाटे व उपशाखाप्रमुख मंगेश परब यांच्या प्रयत्नांतून या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आनंद बगळे व चंदन बगळे यांच्या नेतृत्वाखाली संतोष बगळे, कीशोर बगळे, ओंकार बगळे, अशोक पाटील, जनार्दन डिचोलकर, हर्षद डिचोलकर, गणपत डिचोलकर, भरत बगळे, मनोज बगळे, विलास बगळे, सुनील बगळे, दिपक बगळे, रितेश बगळे, महेश बगळे, रमाकांत बगळे, अरूण बगळे, प्रमोद बगळे, पंडीत बगळे, सतीश बगळे, चेतन डिचोलकर, दिपक पाटील, संतोष पाटील, भावना बगळे, नुतन बगळे, श्वेता बगळे, दत्तप्रसाद बगळे, विजय बगळे, विनायक बगळे, गौरेश बगळे, मोहन बगळे, प्रशांत बगळे, सुषमा डिचोलकर, दर्शना डिचोलकर, आनंदी डिचोलकर, मंगला डिचोलकर, मयुरेश डिचोलकर आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि भगवा झेंडा हाती घेतला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विभागात हा शिवसेना पक्षप्रवेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments