मराठा समाजाबाबत केसरकरांसह नाईकांची भूमिका दुटप्पी…

2

परीमल नाईकांचा आरोप:मतावर डोळा ठेवून भेट घेण्याचा दिखावूपणा…

सावंतवाडी ता.१८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार वैभव नाईक यांची भूमिका मराठा समाज बांधवा बाबत दुटप्पी दिसून आली,असा आरोप सावंतवाडीचे नगरसेवक तथा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष परीमल नाईक यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
श्री.नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की,एका बाजुने मुख्यमंत्र्यांचे कणकवली नगरीत या दोघांनी स्वागत केल्यानंतर याच दौ-याच्या निमित्ताने जेरबंद केलेल्या मराठा समाजाचे नेते अँड.सुहास सावंत व अन्य आंदोलन कर्त्याची पोलिस ठाण्यात जावून दोघांनी घेतलेली भेट म्हणजे एकच फुलांचा गुच्छ “मयताला व लग्नाला” वापरण्यासारखे आहे.वास्तविक केसरकर राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत.त्याना खरोखरच डांबून ठेवलेल्या नेत्यांना दिलासा व न्याय ध्यायचा झाल्यास सहजरीत्या कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून त्यांची सनदशीर मार्गाने सुटका करता आली असती.व मुख्यमंत्री यांच्याशी सुसंवाद साधून मराठा आरक्षण सारख्या ज्वलंत विषया वर त्यांना चर्चा करता आली असती.
जेरबंद केलेले नेते हे सुद्दा एक नामवंत वकील व प्रतिष्ठीत असामी असल्याने त्यांनी कायद्याचे काटेकोरपणे पालन करुन सकारात्म्क प्रतिसाद दिला असता,व मुख्यमंत्री यांनी सुद्दा त्यास आदर राखून सहमती दिली असती, परंतु तशी कोणतीही तसदी न घेता “खाण्याचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे” या उक्ती प्रमाणे मा.पालक मंत्री व आमदार यांचे वर्तन म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन मराठा समाजाचा दिलासा व सहानुभुती मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे दृढतर होत आहे.असे यात म्हटले आहे.

15

4