सचिव पदी यशवंत परब यांची निवड
सिंधुदुर्गनगरी.ता१८:
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या शैक्षणिक प्रगतितील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल या संस्थेच्या अध्यक्षपदी आनंद उर्फ भाई सावंत यांची तर सचिव पदी यशवंत बळीराम परब यांची निवड झाली आहे.
धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल या संस्थेच्या ११ संचालक पदांसाठी २८ जुलै रोजी निवडणूक झाली. या ११ संचालक पदांपैकी ८ पदे बिनविरोध झाली तर केवळ तिन पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.
या संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी खोटले ता. मालवण येथील आशीष परब आणि ओरोस येथील आनंद उर्फ भाई सावंत हे दोन उमेदवार रिंगणात होते. यात भाई सावंत यांनी ६ विरुद्ध ३ अशा मतांनी आशीष परब यांच्यावर मात केली. या निवडित एकूण ११ पैकी ९ संचालकांनी दोन उमेदवारांना मतदान केले. तर एका संचालकाने नोटाला मतदान केले. तर एकाने या निवडणुकीपासून तटस्थ राहणेच पसंत केले.
अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर या संस्थेच्या सचिवपदी या संस्थेचे माजी अध्यक्ष ब. के. परब यांचे चिरंजीव यशवंत परब (कसाल), उपाध्यक्ष पदी जगदीश मोडक (ओसरगांव ) आणि खजिनदार म्हणून संजय परब ( पडवे) यांची बिनविरोध निवड जाली आहे.