उप प्रादेशिक परिवहनतर्फे वाहतूकदारांना आवाहन

2

सिंधुदुर्गनगरी.ता,१८: जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी सदर वाहतूक करण्यापूर्वी वाहनामध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 125 ई च्या तरतूदीनुसार वाहनाच्या बांधनीमध्ये बदल करुन आपल्या वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन स्पेशल लायसेन्स प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक पहिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2

4