मराठा लाईट इन्फन्ट्री अंतर्गत सैन्य भरती

2

सिंधुदुर्गनगरी.ता,१८: आजी -माजी सैनिक, युद्ध विधवा तसेच माजी सैनिक विधवा यांच्या पल्यांसाठी दी मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे सोल्जर जी.डी., सोल्जर ट्रेड्समन व सोल्जर क्लार्क या पदांकरिता दिनांक 25 सप्टेंबर 2019 पासून पुढे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गासाठी या भरतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तरी दी मराठा लाईट इन्फन्ट्रीशी संबंधित आजी माजी सैनिक, युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा यांच्या जास्तीत जास्त पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

27

4