माजी सरपंच, कट्टर राणे समर्थक निसार शेख यांचा भाजपात प्रवेश

2

 

कणकवली, ता.१८ : कलमठ गावचे माजी सरपंच, कट्टर राणे समर्थक निसार शेख यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पुष्पगुच्छ देत निसार शेख यांचे पक्षात स्वागत करत अभिनंदन केले.
भाजप पक्ष हा सर्व घटकांना सामावून घेणारा पक्ष आहे. तसेच अल्पसंख्याकाच्या बाबतीत व्देष न करणारा आहे. यापुढेही पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली .
या प्रवेशाला उत्तर देताना निसार शेख म्हणाले, राणे कुटूंबियाचे व माझे कोणतेहि वैयक्तिक वाद नाहीत. भाजप पक्षाची ध्येय,धोरणे व विचार आवडल्याने आपण भाजप पक्षात प्रवेश केला आहे. कलमठ गावाच्या विकासासाठी तसेच
पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल,राजू राऊळ,बबलू सावंत,प्रदीप गावडे,विजय चिंदरकर,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष बाबुल शेख,अमोल चिंदरकर,रमेश पावसकर,समर्थ राणे,सदा चव्हाण,संतोष पुजारे,प्रसाद देसाई आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो – निसार शेख यांचेपुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, संदेश पटेल,बबलू सावंत,प्रदीप गावडे,विजय चिंदरकर,रमेश पावसकर,बाबुल शेख

8

4