2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी;ता.१८: राष्ट्रीय आरोग्य अभियानाखालील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये १२ तपासणी पथके कार्यरत आहेत. ० ते १८ वयोगटातील बालकांना पथकातीलवल वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत १५९५ आंगणवाडीतील ४० हजार ७०० मुलांची वर्षातून दोनदा आणि १ हजार ७१७ शाळांमधील १ लाख २० हजार २९५ मुलांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते.तपासणी दरम्यान आढळलेल्या संशयित हृदय रोग ग्रस्त मुलांसाठी यंदाच्या वर्षी २० पैकी १२ मुलांवर मुंबई येथील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
सदर शस्त्रक्रियेसाठी सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नाही अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.