काॅग्रेस सावंतवाडी विधानसभा लढण्याच्या तयारीत…

2

वेत्येत गुप्त बैठक; सर्व स्थानिक कार्यकर्त्यांची आग्रही मागणी…

सावंतवाडी ता.१८: आगामी काळात होणारी विधानसभा निवडणुक काँग्रेस लढविण्याच्या तयारीत आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गोपनीय बैठक नुकतीच वेत्ये येथे पार पडली.यावेळी सावंतवाडी विधानसभा लढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.मात्र याबाबत पदाधिका-यांना विचारले असता लवकरच आमची भूमिका समजेल असे सांगण्यात आले.
या बैठकीत जवळपास ३०० पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.यात अॅड.दिलीप नार्वेकर,राजू मसुरकर,विभावरी सुकी, साक्षी वंजारी,बाब्या म्हापसेकर,बाबल्या दुभाषी, महेंद्र सांगेलकर,चंद्रकांत राणे,दोडामार्ग ता.अध्यक्ष बाळा धावुसकर, अॅड.राघवेंद्र नार्वेकर,सांगेली सरपंच डाॅ.सौ. राऊळ, संतोष शांताराम जोईल.दया धुरी,मोहन सावंत,संदिप कोठावळे,एन एस यु आय अध्यक्ष कौस्तुभ गावडे,चैतन्य सावंत,अॅड. नीता गावडे. बाळा जाधव,सुधीर मल्हार,दिपक सावंत कुणकेरी ,बांदा शहर अध्यक्ष राजेश गोवेकर,दिगंबर परब , रवी आमडोसकर,तोकीर शेख,स्वत: बाळा गावडे आदी उपस्थित होते.
येत्या विधानसभेसाठी काॅग्रेसची रणनीती ठरवण्यात आली.व स्नेह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला.असे समजते.तशी गोपनीय माहिती समजु शकली नाही.

23

4