पत्रकार चंद्रकांत सामंत यांना मातृशोक…
कुडाळ, ता. १८ : परुळे- मांजारडे वाडी येथिल श्रीमती लक्ष्मी सहदेव सामंत (वय-८५) यांचे आज सायंकाळी सव्वासात वाजता वृद्धापकालाने राहत्याघरी निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, परुळे बाजार येथील दुकानदार सुंदर सामंत, कुडाळ एसटी आगाराचे वाहक भाऊ सामंत, श्रीदेव आदिनारायण देवस्थान कमिटीचे
दामोदर सामंत यांच्या त्या मातोश्री व तेंडोली येथील वामन प्रभु यांच्या त्या सासू होत. अंत्यविधी उद्या सकाळी दहा वाजता परुळे कुशेवाडा येथे होणार आहे.