जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी प्रा. सचिन परुळकर यांची निवड…

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी प्रा. सचिन परुळकर यांची निवड…

वेंगुर्ले, ता.१८ : पंचायत समिती वेंगुर्ला-जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी म्हणून श्री वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांची निवड करण्यात आली आहे.
वेंगुर्ले-तुळस येथील रहिवासी आणि श्री वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांनी सहकाऱ्यांच्या सोबतीने गावसह तालुक्यात अनेक उपक्रम तसेच उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्यक्रम राबविले आहेत. त्यांचा प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास लक्षात घेता त्यांची जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या निमंत्रित सदस्य पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

\