आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतील मोफत स्पर्धा ; प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना ; यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यासक्रम ५ ऑक्टोबरपासून होणार सुरू…

कणकवली, ता. १९ : आम. नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून यूपीएससी, एमपीएससीचे मोफत मार्गदर्शन ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांचा या मार्गदशन वर्गासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. ८५ युवक-युवतींनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यात कणकवली केंद्रात ५५, देवगड केंद्रात २० तर वैभववाडी केंद्रावर १५ असे ८५ जणांनी प्रवेश घेतले आहेत. या व्यतिरिक्त फोनद्वारे संपर्क साधून माहिती घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. ही प्रवेश प्रकिया १ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून ५ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष मार्गदर्शन वर्ग सुरू होणार आहेत. तरी जास्तीत जास्त युवक युवतींनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन ज्ञानसंगम मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
ड्रीम फाउंडेशन नामांकित संस्थेचा सहयोग असलेल्या या मोफत मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे लेखन करणारे लेखक मार्गदर्शन करणार आहेत. ३० तज्ज्ञ मंडळींची टीम प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. या व्यतिरिक्त राज्यातील आयपीएस अधिकारी भूषण गगराणी, विश्वास नांगरेपाटील यांच्यासारखे अधिकारी येऊन संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील तीन ठिकाणी केंद्र असली तरी उर्वरित पाच तालुक्यातील युवक-युवतींनी आपल्याला सोयीचे होईल अशा केंद्रावर प्रवेश घ्यावा. १०वी,११वी, १२वी शिकणारे विद्यार्थीही या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ शकतील. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी तिन्ही केंद्रांवर हा अभ्यास व मार्गदर्शन घेतले जाणार आहे. पूर्णतः मोफत मार्गदर्शन केले जाणारे हे एकमेव केंद्र आहे. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी विजय गोसावी मो.बा. ९६२३९०९८६७
/८२०८८४३२६८ यांच्याशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

7

4