केसरकरजी लगे रहो ……

2
  • नितेश राणेंचा पलटवार :तुमच्या बोलण्यामध्ये आमचाच फायदा

कणकवली 
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपाने राणेंना उमेदवारी दिल्यास शिवसेना कणकवली मतदार संघात उमेदवार उभा करेल अशा केलेल्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी आपल्या शैलीत पलटवार केला आहे केसरकरजी तुम्ही बोलत राहा… तुमच्या बोलण्यात आमचा फायदा आहे…. असे ट्विट करून केसरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपा प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यात खुद्द राणेंनी यावर प्रकाश टाकला होता. लवकरच आपण भाजपात प्रवेश करणार असून नितेश राणे हे कमळ या निशाणी वर निवडणूक लढवतील असा त्यांनी दावा केला होता.
हा दावा झाल्यानंतर काही क्षणातच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीच्या माध्यमातून राणेंवर टीका केली होती भाजपाने राणेंना उमेदवारी दिल्यास शिवसेना कणकवलीत आपला उमेदवार उभा करेल. मुख्यमंत्र्यानी राणेंना व्यासपिठावर घेतले नाही याचा अर्थ त्यांना भाजपात घ्यायचे नाही असा होतो.अशी टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. यात केसरकर जी तुम्ही बोलत राहा तुमच्या बोलण्यामध्ये आमचा फायदा आहे असे त्यांनी ट्टवीट केले आहे.या नंतर पुन्हा एकदा केसरकर विरुद्ध राणे असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुद्धा भाजपा राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0

4