शासकीय मदतीपासून वंचित पूरग्रस्त कुटुंबाना मनसेचा दिलासा…

2

दक्षिण-मुंबईतील नेत्यांकडून आलेल्या मदतीचे सावंतवाडी मनसेकडून वाटप…

सावंतवाडी ता.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नुकत्याच ओढवलेल्या पूरपरिस्थिती ज्या भागात शासनाची कोणतीही मदत पोहोचली नाही,अशा भागातील पूरग्रस्तांना मदत करण्याचा पुढाकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घेण्यात आला आहे.दक्षिण मुंबईतील नेत्यांकडून आलेल्या या मदतीचे वाटप जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नियोजनातून सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
मुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.त्यांना सावरण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.अशा परिस्थितीत शासनाकडून सुद्धा पूरग्रस्त भागात शासकीय मदत पुरविण्यात आली.मात्र काही दुर्गम भागात या मदतीची कोणतीही रक्कम अथवा धान्य-साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहचू शकली नाही.या मदतीपासून वंचित राहिलेल्या बांदा येथील लक्ष्मण बेळगावकर व माजगाव येथील संतोष गाड यांच्या कुटुंबीयांना येथील मनसेच्या वतीने धान्य व वस्तू स्वरुपात ही मदत देण्यात आली.
यावेळी संतोष भैरवकर,आशिष सुभेदार,ललिता नाईक,विनय सोनी आदींनी उपस्थित राहून ही मदत पोहोचविण्यास पुढाकार घेतला.

7

4