मोनोरेल आणी विकासकामाच्या उदघाटनावरून पालकमंत्री केसरकर टार्गेट

2

पालिका पदाधिका-यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप:६ विरूध्द ९ असे मतदान घेवून केसरकरांचा निषेध

सावंतवाडी ता.१९: सभागृहाची कोणतीही परवानगी न घेता आज सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेले मोनोरेलचे उद्घाटन हे सभागृहाचा व नगराध्यक्षचा अपमान करणारे आहे.असा आरोप करीत आज येथील पालिका सभेत विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात “धुमशान” घातले.यावेळी केसरकर यांच्या निषेधाचा ठराव नगरसेवक राजू बेग व परिमल नाईक यांनी मांडला.
याला माजी उपनगराध्यक्ष अनारोजीन लोबो यांनी विरोध केला.परंतु अखेर मतदान घेऊन त्यांच्या विरोधात नऊ विरुद्ध सहा मतानी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध ठराव घेण्यात आला.यावेळी आक्रमक झालेल्या लोबो यांनी आपल्या सहकारी नगरसेवक घेऊन सभात्याग केला.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर सावंतवाडीतील नगरपालिकेची प्रॉपर्टी आपली प्रॉपर्टी असल्यासारखे वागत आहेत,असा आरोप अँड. परिमल नाईक यांनी केला.काही झाले तरी आपण हा प्रकार खपवून घेणार नाही,असे राजू बेग यांनी सांगितले.तर नगराध्यक्षाला विश्वासात न घेता कळवण्यात आलेले उद्घाटन हा शहरासह नागरिकांचा अपमान आहे.असा आरोप अन्नपूर्णा कोरगावकर जयेद्र परुळेकर यांनी केला.त्यानंतर ही उदघाटने रद्द करण्यात आली,असे विरोधकांकडुन सांगण्यात आले.या विषयाला भाजपाचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी वाट करून दिली.
यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,बाबू कुडतरकर,शुभांगी सुकी,भारती मोरे,दिपाली भालेकर,समृद्धी विरनोडकर आदी उपस्थित होते.

0

4