आठ दिवसात माझा भाजप प्रवेश…!

2

नारायण राणे:आधी संसार तरी थाटतो,नंतर प्रश्न विचारा पत्रकारांना चिमटा

सावंतवाडी ता.१९: येत्या आठ दिवसात माझा भाजपा प्रवेश होईल,त्यासाठी आवश्यक असलेले ज्योतिष मी काढले आहे.आधी मला गृहप्रवेश करून नवा संसार थाटूदे नंतर काय ते प्रश्न विचारा,असा उपहासात्मक टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.मी भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्हा निश्चित भाजपमय होईल,पुढचे आमदार खासदार हे भाजपचे असतील.असा विश्वास व्यक्त करून स्थानिक नेत्यांच्या टीकेवर मी बोलणार नाही,माजी वरिष्ठ स्तरावरील नेत्यांशी बोलणी सुरू आहेत,असे राणे यांनी सांगितले
श्री.राणे यांनी आज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत,सभापती पंकज पेडणेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत,तालुकाध्यक्ष संजू परब,परीमल नाईक,गुरुनाथ पेडणेकर,आदी उपस्थित होते.

श्री.राणे पुढे म्हणाले,येत्या आठ दिवसात माझा भाजप प्रवेश होणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेली बोलणी माजी वरिष्ठ नेत्यांशी चालू आहेत.त्यामुळे स्थानिक पातळीवर कोण काय बोलले याकडे मी लक्ष देणार नाही.मी ज्या-ज्या ठिकाणी सभा घेत आहे.त्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना माझ्यासोबत या,असे आवाहन करीत आहे.आणि कार्यकर्त्यांकडून सुद्धा तितकाच प्रतिसाद मिळत आहे.येणाऱ्या काळात तुम्ही घेतलेला निर्णय आम्ही नक्कीच पाहून तुमच्या पाठीशी राहू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्यामुळे लवकरच मी माझ्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
नाणार बाबत आपली भूमिका काय असे राणे यांना विचारले असता,ते म्हणाले आधी भाजपात प्रवेश तरी करतो,त्यानंतर भूमिका जाहीर करेन आत्ताच भूमिका सांगायला हा प्रकल्प जिल्ह्यात दोन-तीन दिवसात होणार नाही.त्यामुळे याप्रश्नी घाई नको,मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोघांनी ठरवले आहे.त्यामुळे वेळ आल्यावर उत्तर देईन ईव्.ही.एम मशीन बाबत विचारलेला प्रश्नाला आपली नो कॉमेंट्स असे सांगितले.

3

4