जिल्हा परिषद शाळा परबवाडा नं.१ च्या सांस्कृतिक हाॅलचे उद्घाटन…

2

वेंगुर्ले ता.१९: जि.प.शाळा परबवाडा नं.१ च्या बहुउद्देशीय सांस्कृतिक हाॅल नूतनीकरण जि.प.सदस्य विष्णूदास उर्फ दादा कुबल यांच्या प्रयत्नातून व सरपंच विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जि.प.सिंधुदुर्गच्या चार लाख निधी खर्च करून नूतनीकरण व सुसज्ज करण्यात आलेल्या बहुउद्देशीय सांस्कृतिक हाॅलचे उद्घाटन गावातील जेष्ठ महिला व शाळेच्या दात्या श्रीम.सविता उर्फ माई परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

परबवाडा येथील या कार्यक्रमाला विष्णूदास उर्फ दादा कुबल,श्री.विष्णू उर्फ पप्पू परब तसेच संजय मळगांवकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी शोभराज शैर्लेकर, माजी सभापती श्री.सारीका काळसेकर, माजी गटशिक्षणाधिकारी श्री रमेश पिंगुळकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, श्रीम.पौर्णिमा नाईक उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री.नितीन बांदेकर उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, श्रीम.निकीता पवार उपाध्यक्ष माता पालक संघ, रवि परब, संदिप परब, कांता देसाई, नाना परब, विलास दळवी, अनुप गावडे सर्व शिक्षक बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सांस्कृतिक हाॅलसाठी ४लाख निधी मिळवून दिल्याबद्दल दादा कुबल यांचा सत्कार व पप्पू परब सरपंच परबवाडा यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. श्री. कुबल यांनी बोलतानां शाळेमध्ये कमी शिक्षक असूनही शिष्यवृत्तीपरीक्षा, क्रीडास्पर्धेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे व कौतुकास्पद आहे, तसेच पुढील वर्षी शाळेच्या तिन्हीं व्हरांड्यातील सर्व खिडक्याना स्लायडिंगसाठी जि.प.च्या निधीतून निधी देण्याचे जाहीर केले. तर सरपंच श्री. परब यांनी बोलतांना स्पर्धा परीक्षेमधील यशाबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले व ग्रामपंचायत निधीतून सर्व वर्गासाठी नवीन सॉफ्टवेअर व वॉटर प्युरीफायर देण्याचे जाहीर केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्रीम अनिता राॅडीग्ज, सुत्रसंचालन श्री.रामचंद्र झोरे, प्रास्ताविक श्रीम. सोनाली परब व आभार श्रीम. प्रांजल देसाई यांनी केले.

0

4