“ग्लोबल कोक” कंपनीला पोलीसांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद…

2

योगेश महालेंचा आरोप; आयी-वझरे गावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण…

सावंतवाडी ता.१९: ग्लोबल कोक कंपनीमुळे आयी-वझरे गावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू आहे.तर या वाहतुकीला पोलीस प्रशासन आणि काही राजकीय पदाधिका-यांचे आशीर्वाद आहेत,असा आरोप भाजपचे पदाधिकारी योगेश महाले यांनी केला.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आयी-वझरे गावात काळ्या पावडर पासुन कोळसा तयार करणारी ग्लोबल कोक म्हणजेच वेदांत कंपनी सध्या आयी-वझरे या गावातून दिवस रात्र कोळशाची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक करीत आहे. या वाहतुकीला तालुक्यातील प्रशासन व काही राजकरण्यांच्या आशीर्वादाने ही वाहतूक केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
वझरे येथील कंपनीत तयार झालेल्या कोळश्याची गोव्यात वाहतूक केली जाते.ही वाहतूक १४ ते १६ चाकी ट्रक मधून दिवस रात्र केली जात असल्याने या वाहतुकीमुळे मोठा अपघात ही होण्यास नाकारता येत नाही त्याच प्रमाणे या होणाऱ्या वाहतुकीमुळे सर्वत्र प्रदूषण पसरत असल्याने याचा परिणाम शेती बाग़ायती बरोबरच मनुष्य जीवावर होऊ शकतो या कोळशाच्या भूकटी मुळे आजार ही होउ शकतात त्यामुळे स्थानिक ग्रामस्तानी याचा विचार करून अशा कंपनीका आताच हाकलुन लावावे अशी मागणी श्री.महाले यांनी केली आहे.
*ग्लोबल कोक कंपनि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड़*
वझरे येथील ग्लोबल कोक कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड़ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड़किस आला आहे. गेल्या महिन्यात कंपनीत बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोणाचीही परवानगी न घेता वृक्षतोड़ केल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यात एकोसेंसिटिव्ह झोन असताना ही बेसुमार वृक्षतोड़ कोणाच्या आशीर्वादाने केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकारावर प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास आयी वझरे ग्रामस्ताना घेऊन रसत्यावर उतरणार असल्याचा इशारा भाजपचे शक्ति प्रमुख योगेश महाले यांनी पत्रकराशी बोलताना स्पष्ट केले.

2

4