खांबाळे येथील सदानंद पवार यांना उत्कृष्ट भात पीक उत्पादक पुरस्काराने सन्मानित

2

तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित

वैभववाडी.ता,१९: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघामार्फत तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पार पडलेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन महेश संसारे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारामध्ये सदानंद महादेव पवार यांना उत्कृष्ट भातपिक उत्पादक पुरस्कार देण्यात आला आहे. नामदेव बाबू शेटये – उत्कृष्ट ऊस उत्पादक, प्रकाश मनोहर पांचाळ – उत्कृष्ट काजू उत्पादक, इंद्रजित महादेव परबते – उत्कृष्ट प्रयोगशील शेतकरी, संभाजी श्रीरंग रावराणे – उत्कृष्ट कुक्कुटपालन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संतोष श्रीधर टक्के यांना संघाच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. या सभेला शांताराम रावराणे, गिरीधर रावराणे, सिमा नानिवडेकर, बंडू मुंडले, पुंडलिक पाटील, संजय रावराणे, अंबाजी हुंबे, बँक अधिकारी श्री प्रभू व संघाचे सभासद शेतकरी उपस्थित होते. खरेदी विक्री संघाच्या यशस्वी वाटचालीस भरीव योगदान दिल्याबद्दल जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील तसे संघाचे सचिव सिध्देश रावराणे यांना संघाच्या वतीने सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महेश संसारे म्हणाले, तालुक्यातील देवधर व अरुणा प्रकल्यामुळे बरीच गावे सिंचनाखाली येणार आहेत. भविष्यात शेती क्षेत्रात वैभववाडी तालुका जिल्ह्यात अग्रेसर असेल. स्थानिक शेतकऱ्यांना शेती विषयक आवड निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संघाने शेतकऱ्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दिगंबर पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ घेतला पाहिजे. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी असल्याचे सांगितले. आभार सचिव सिध्देश रावराणे यांनी मानले.

फोटो- उत्कृष्ट प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने इंद्रजित परबते यांना सन्मानित करताना वैभववाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील व इतर.

4

4