रामचंद्र झोरें यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

2

वेंगुर्ले.ता.१९:  जि.प.शाळा परबवाडा नं.१ चे उपशिक्षक श्री.रामचंद्र धोंडी झोरे यांना भारत सरकार चे आरोग्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र इंडिया या संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी श्री.रामचंद्र झोरे यांनी आपल्या सेवाकाळात शिष्यवृत्ती परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षा, क्रिडा स्पर्धा, लोकसहभागातून शाळेचा विकास, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार श्री. नाईक यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यसभागृह इन्स्टिट्यूट मिनीझीस ब्रगांजा पणजी गोवा येथे प्रदान करण्यात आला.
श्री.रामचंद्र झोरे यांच्या सेवेची सुरवात जि. प. शाळा तुळस-वडखोल या दुर्गम भागात झाली. तेथे त्यांनी शिष्यवृत्ती जादा वर्ग घेऊन मार्गदर्शन केल्यामुळे सलग आठ वर्षे ४थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १००% व अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी जिल्हास्तरावर चमकले व लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत तुळसने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
सन २०१६ मध्ये त्यांची प्रशासकीय बदली जि.प.शाळा परबवाडा न.१ मध्ये झाली. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सलग तीन वर्षे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, ब्रेन डेव्हलमेंट, एस्. टी.एस्,एम्.टी. एस, गुरुकुल, डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यासारख्या स्पर्धा परीक्षामध्ये अधिकाधिक मुले बसवून अनेक विद्यार्थी गुणवत्ताधारक बनले म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

23

4