वेंगुर्ले येथे शिवसेना पुरस्कृत नवरात्रोत्सव २०१९ कमिटी जाहीर

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भरगच्च कार्यक्रमानी नवरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन

वेंगुर्ले.ता.१९: वेंगुर्ले तालुका शिवसेना संपर्क कार्यालय सुंदर- भाटले-वेंगुर्ला येथे रविवारी दिनांक २९ सप्टेंबर २०१९ ते मंगळवार ८ ऑक्टोंबर २०१९ या कालावधीत प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने भरगच्च कार्यक्रमानी सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
दुर्गा मातेच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या अलोट गर्दीने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या भरगच्च आयोजनाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटी अध्यक्ष म्हणून हेमत मलबारी, उपाध्यक्ष गजानन गोलतकर , खजिनदार विवेकनंद आरोलकर, सचिव सुरेश वराडकर, प्रमुख सल्लागार यशवंत परब ( तालुका प्रमुख), सह-सचिव अनंत गावडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नितिश कुडतरकर, शेखर काणेकर, सुहास मेस्त्री, पुजा कमिटी दिलीप राणे, अभिनय माजरेकर, छोटू कुबल, व्यवस्थापन कमिटी लवू तेरसे, सुनिल वालावलकर, डिलीन डिसोजा, अजित राऊळ, संदीप केळजी, सुरेश भोसले, मिथुन सातार्डेकर, अधिक माहितीसाठी संपर्क अभिनय माजरेकर-मो. ९४२३३००७९१ दिलीप राणे मो.९९२३३९२३६४ छोटू कुबल मो. ८४८२९१३१५५ यांच्याशी संपर्क साधावा.
तरी आपण सर्वांनी शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्र उत्सव निमित्त आयोजित सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा, असे सर्वांना आग्रहाचे आमंत्रण वेंगुर्ला तालुका शिवसेना पुरस्कृत नवरात्रोत्सव कमिटीने केले आहे.

\