निषेधाच्या ठरावानंतर सुध्दा पालिकेच्या मोनोरेल,कलादालनाचे उदघाटन…

2

गैरसमज झाल्याचे केसरकरांचे म्हणणे; अन्यथा दोन महीने उदघाटन रखडले असते…

सावंतवाडी ता.१९: पालिका बैठकीत झालेल्या निषेधाच्या ठरावानंतर सुद्धा नियोजित मोनोरेल आणि कलादालनाचे भूमिपूजन व उद्घाटन आज अखेर सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाची कल्पना नगराध्यक्षांना दिली होती.मात्र काही लोकांना गैरसमज झाले,विकासात राजकारण आणणे चुकीचे आहे असे सांगुन फारसा फरक पडत नाही.आज उद्घाटन झाले नसते तर ही दोन्ही कामे आणखी दोन-तीन महिने रेंगाळली असती,असे श्री.केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी नगरपालिकेच्या व एमटीडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या मोनोरेल प्रकल्पाचा भूमिपूजन व कलादालनाचे उद्घाटन श्री केसरकर यांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी शहराच्या विकासासाठी विविध योजनांतून तब्बल ४९ कोटी दीले असल्याचे त्यांनी सांगितले.

2

4