वेंगुर्ले बाजारपेठेमध्ये सापडलेले पाकीट केले वेंगुर्ला पोलिसांच्या स्वाधीन

2

रिक्षाचालक जयंत हळदणकर यांचा प्रमाणिकपणा

वेंगुर्ले.ता.१९:
वेंगुर्ले- हॉलिक्रॉस येथील रिक्षाचालक जयंत हळदणकर यांना वेंगुर्ला बाजारपेठेत गणेश चतुर्थी पूर्वी पाकीट मिळाले असून ते पाकीट त्यांनी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक शशिकांत खोत,पोलीस शेखर दाभोलकर यांच्याकडे आज दिले. दरम्यान संबधीत व्यक्तीने पाकिटाची ओळख पटवून वेंगुर्ला पोलीस ठाणे मधून घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या त्या पाकिटात रोख रक्कम असून ते लेडीज पाकीट आहे.अधिक माहिती साठी संपर्क वेंगुर्ला पोलिस स्टेशन ०२३६६२६३४३३ या नंबरवर संपर्क साधावा. जयंत हळदणकर यांच्या ह्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

1

4