आंबोली गेळे येथील कबुलायतदार प्रश्न सुटल्यात जमा

2

दीपक केसरकर: राणेंना मुख्यमंत्र्यांनी व्यासपिठावर घेतले नाही,याचा अर्थ युती अबाधित

सावंतवाडी ता.१९: आंबोली-गेळे भागाला सतावणारा कबूलायतदार गावकर प्रश्न सुटल्यात जमा आहे.त्यासाठी आवश्यक असलेली तत्त्वतः मंजुरी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.येत्या काही काळात लोकांनी मान्य केलेल्या निर्णयानुसार जमीन वाटप करण्यात येईल,असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नारायण राणे भाजपात येण्यास तयार आहेत.मी पक्ष प्रवेश करणार असे ते वारंवार सांगत आहेत.त्यांना स्टेजवर येण्याची इच्छा असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्टेजवर घेतले नाही याचा अर्थ युती तुटणार असा नाही.येत्या दोन दिवसात युती जाहीर होईल ,त्यांना कोण भाजपात घेणार हे आपल्याला माहित नाही. आणि तरीही त्यांचा प्रवेश झाला,आमदार नितेश राणे यांना तिकीट मिळाले तरी त्याठिकाणी भाजपचे पदाधिकारी त्यांचे काम करणार नाहीत.त्यामुळे कणकवलीत नितेश राणे यांचा पराभव निश्चित आहे,असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले सावंतवाडी शहराच्या विकासासाठी तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे येणाऱ्या काळात शहराचा व पर्यायाने जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने अनेक प्रकल्प राबविण्याचे काम आमच्याकडून सुरू आहे त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा येणाऱ्या काळात होणार आहे आंबोली कबूल आमदार प्रश्न आता निश्चितच मार्गी लागणार आहे त्यासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव तत्वतः मान्य केलेला आहे सावंतवाडी शहरासाठी स्टेट लाईव्ह साठी चार कोटी झाली ती तसेच अंडरग्राउंड वाहनांसाठी आपण पैसे दिले आहेत परंतु काही ही दिवसांपूर्वी केवळ ऑडिटच्या मुद्द्यामुळे अंडरग्राउंड वाहिन्यांचे काम रखडले होते मात्र आता पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्याला मंजुरी द्यावी अशी आपण मागणी केली आहे यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली ज्यांना स्टेजवर जायची इच्छा होती अशा लोकांना मुख्यमंत्र्यांनी स्टेजवर नेण्याचे टायलेट याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना युती टिकवायची आहे त्यामुळे प्राण्यांना त्याठिकाणी इच्छा असतानासुद्धा त्यांनी स्टेजवर घेतले नाही ही वस्तुस्थिती आहे राणे हे अद्यापपर्यंत भाजपात नाहीत ते स्वाभिमान मध्ये आहे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षातून खुशाल निवडणूक लढवावी असाही टोला यावेळी केसरकर यांनी लगावला याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते रुपेश राहुल अनारोजीन लोबो राजन पोके सुनील मुरकर शब्बीर मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते

27

4