मालवण, ता. १९ : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत तालुक्यातील सात लाभार्थ्यांना तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यात तालुक्यातील सुहासिनी शिवा पेडणेकर रा. गोळवण, साक्षी विजय परब रा.गोठणे, मोहिनी संभाजी वायगणकर रा. वायगणी, डोरोतिन विल्यम फर्नाडीस रा.दांडी मालवण, करुणा कालीदास कुबल रा.तारकर्ली, कांचन कृष्णा तारी रा.दाडी मालवण, सुवर्ण सुरेश जाधव रा.नांदरुख आदी लाभार्थ्याचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये रक्कमेच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, वायंगणी सरपंच संजना रेडकर, डॉ. जितेंद्र केरकर, महेश कुबल, शैलेश चव्हाण, मंगेश देऊलकर, सुभाष लाड, नगरसेविका सेजल परब, निवासी नायब तहसिलदार सुहास खडपकर, नायब तहसिलदार साईनाथ गोसावी, इंगायो अका उदय गोसावी, आर. पी. मोंडकर प्रदीप कदम, विलास बागवे, आदी कर्मचारी उपस्थित होते.