कट्टा येथील ज्येष्ठ व्यापारी अण्णा नेवाळकर यांचे निधन…

2

कट्टा येथील ज्येष्ठ व्यापारी अण्णा नेवाळकर यांचे निधन…

मालवण, ता. १९ : कट्टा बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी कमलाकांत उर्फ अण्णा यशवंत सामंत नेवाळकर (वय- ८५) यांचे आज सकाळी राहत्या घरी
अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच दुपारनंतर कट्टा बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा व्यक्त करण्यात आला. दुपारी चार वाजता कट्टा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये तसेच नितीन वाळके, प्रमोद ओरसकर, जयंतराव कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.
त्यांच्यामागे पत्नी, चार मुलगे एक विवाहित कन्या, सुना, नातवंडे जावई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन जिल्हा कार्यवाह विवेक नेवाळकर यांचे ते वडील होत. तसेच जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य अरविंद नेवाळकर यांचे ज्येष्ठ बंधू होत.

19

4