निरोम येथून तरुण बेपत्ता…

2

निरोम येथून तरुण बेपत्ता…

आचरा, ता. १९ : निरोम घाडीवाडी येथील विनोद मारुती राऊत (वय- ३८) हे ११ सप्टेंबर दुपारी ३ वाजल्यापासून राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांचा भाचा अर्जुन परब याने आचरा पोलिस ठाण्यात विनोद राऊत हे बेपत्ता असल्याची खबर दिली आहे. विनोद राऊत हे कोणाला दिसून आल्यास संबंधितांनी आचरा पोलिस ठाण्यास (२४६१००) किंवा मोबाइल नंबर ९४२३३०१५३५ येथे संपर्क साधावा असे आवाहन ठाणे अंमलदार श्री. चव्हाण यांनी केले आहे.

8

4