एसटी आगाराचा सर्व्हर बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक तिष्ठत…

2

कुडाळ येथील घटना: प्रशासनाच्या भूमिकेवर भाजपाकडून नाराजी…

कुडाळ.ता,१९: येथील एसटी आगाराच्या तिकीट काउंटरचा सर्व्हर बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तब्बल चार तास रांगेमध्ये तिष्ठत रहावे लागले.
ही घटना आज दुपारी घडली.अखेर याबाबत भाजपाचे युवा तालुकाध्यक्ष योगेश बेळणेकर यांनी आक्रमक भूमिका घेत एसटी प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ सहकार्य करा, सर्वर बंद असल्यास ऑफलाइन सेवा द्या अशी मागणी केली.
त्या नंतर यंत्रणा हलली व त्यांनी तात्काळ जेष्ठ नागरिकांना सेवा दिली.या सर्व प्रकारामुळे एसटी आगार व अधिकाऱ्यांच्या विरोधात उपस्थित ज्येष्ठ नागरिक कमालीची नाराजी व्यक्त करण्यात आली.

9

4