डॉक्टर, कर्मचारी निवासस्थान इमारतीचे आम. नाईक यांच्या हस्ते उदघाटन…
मालवण, ता. १९ : सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून तसेच आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून चार डायलिसीस मशीन मालवण ग्रामीण रुग्णालयास उपलब्ध झाल्या आहेत अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शासनाच्या तीन कोटी रुपये निधीतून उभारलेल्या डॉक्टर व कर्मचारी निवासस्थानांचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी डॉक्टर पाटील यांनी लवकरच ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा उपलब्ध होईल असे स्पष्ट केले.
निवासस्थानांच्या उदघाटन कार्यक्रमास प्रभारी अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, डॉ. विजयालक्ष्मी शानबाग, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, रुची राऊत, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, गौरव वेर्लेकर, महेंद्र म्हाडगूत, दीपक मयेकर, नगरसेविका सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, अंजना सामंत, नंदा सारंग, पूनम चव्हाण, नरेश हुले, यशवंत गावकर, प्रदीप रेवंडकर, पूजा तोंडवळकर, नागेश चव्हाण यासह बांधकाम विभागाचे अधिकारी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना निवासस्थानाचा प्रश्न गेली काही वर्षे भेडसावत होता. याबाबत आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यातून तीन कोटीचा निधी शासनस्तरावर मंजूर झाला. त्यातून ही इमारत उभारण्यात आली. शहर व परिसरातील डायलिसिस रुग्णांसाठी आवश्यक असणारी डायलिसीस मशीन रुग्णालयात उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता आमदार नाईक यांनी एकाच वेळी चार मशीन उपलब्ध केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
डॉक्टर दोन बंगले, वर्ग तीन कर्मचारी पाच निवासस्थाने, वर्ग चार कर्मचारी ३ निवासस्थान, असा एकूण दोन डॉक्टर्स व आठ कर्मचाऱ्यांसाठी चार इमारतींचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. रुग्णालयात नव्याने रुजू झालेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयालक्ष्मी शानबाग यांनी आपल्या निवासस्थानाचा ताबा घेतला.