शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेऊन विकास साधा…

2

आमदार वैभव नाईक ; वायंगणी ग्रामपंचायत येथील कृषी कक्षाचे उद्घाटन…

आचरा, ता. १९ : शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आपला विकास साधण्याचे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी वायंगणी ग्रामपंचायत येथे केले.
शासन आदेशानुसार वायंगणी ग्रामपंचायत येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कृषी कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वायंगणी सरपंच सौ. संजना रेडकर, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, कृषी पर्यवेक्षक एस जी परब, चौधरी, आचरा मंडळाचे अय्याज शेख, सुनील कदम,खराडे, वायंगणी पर्यवेक्षक सुशीलकुमार शिंदे, श्री. चुंबळकर, श्री. म्हसेकर, प्रमिला तांबे, वायंगणी ग्रामविकास अधिकारी चंपा रावले याच्यासह वायंगणी ग्रामपंचायत सदस्य तसेच बहुसंख्य शेतकरी आदी उपस्थित होते.
कृषी अधिकारी गोसावी यांनी गावपातळीवरील क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना गावपातळीवर कोणतेही कार्यालय उपलब्ध नव्हते. यासाठी कृषी विभागाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आयुक्तालयाकडून ग्रामस्तरावर कृषी सहाय्यकारी ग्रामपंचायतीमध्ये हक्काची जागा मिळाली आहे. कृषी सहाय्यकास कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे सोईचे होणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत खरेदी केलेल्या पाॅवर टिलरचे प्रकाश माळकरी यांना अनावरण करण्यात आले.

5

4