‘निर्वासित’ एकांकिकेतील कलाकारांचा २१ रोजी सत्कार…

109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आम. वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची उपस्थिती…

मालवण, ता. १९ : मुंबई विद्यापीठाच्या ५२ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ या एकांकिकेतील सहभागी सर्व कलाकारांचा सत्कार सोहळा २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
सत्कार सोहळ्यानंतर मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या निर्वासित या एकांकिकेचा प्रयोग सादर होणार आहे. हा सत्कार समारंभ कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण व महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नाट्यरसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. पी. खोबरे यांनी केले आहे.

\