राणे भाजपात आल्यास निश्चीतच फायदा,आमचा विरोध नाही

2

राजन तेली:आपल्याच लोकांनी निषेध केला,याचे केसरकरांनी आत्मचिंतन करावे

सावंतवाडी ता.२०: भाजपाची ताकद निश्चितच वाढली आहे,तरीही नारायण राणेंसारखे वजनदार नेते पक्षात आले तर त्याचा फायदा होणार आहे.त्यांना घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावरावरील पदाधिकारी निर्णय घेतील.आमचा त्याला कोणताही विरोध नाही,पक्षाचा आदेश मानून आम्ही निश्चितच काम करू,असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर त्यांच्याच ताब्यात असलेल्या नगरपालिकेत त्यांच्या निषेधाचा ठराव होतो हे योग्य नाही. पालिका पदाधिकाऱ्यांचा अधिकार डावलून त्यांनी भूमिपूजन केल्यामुळे ही वेळ आली त्यामुळे नेमके हे काय झाले त्याचे आत्मचिंतन करावे असा सल्ला देत,आंबोली कबुलायतदार प्रश्नासंदर्भात यापूर्वीच प्रयत्न होणे गरजेचे होते.तब्बल दहा वर्षे आमदार असताना त्यांचे कोणी हात धरले होते का? असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी उपस्थित होते.

28

4