सावंतवाडी.ता,२०: किरकोळ कारणावरून गैरसमज करून एका ग्रामसेवकाला गावातील व्यक्तीकडुन बेदम मारहाण करण्याचा प्रकार नुकताच एका गावात घडला आहे.
ही घटना काल रात्री घडली. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकांनी अद्यापपर्यंत कोणतीही पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही.मात्र या प्रकाराची चर्चा गावात जोरदार सुरू होती.तो ग्रामसेवक ग्रामपंचायतीत पंचक्रोशीतील एका ग्रामपंचायतीत कार्यरत आहे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचारी उशीर झाल्यामुळे तो घरी सोडण्यासाठी गेला होता.
मात्र गैरसमजातून त्याला मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे.या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.