वैभववाडी उंबर्डे रस्ता गेला ‘खड्ड्यात’!

2

ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांसह प्रवाशांमधून तीव्र संताप

वैभववाडी/पंकज मोरे.ता,२०: राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबता थांबेना.! या मुसळधार कोसळणा-या पावसामुळे रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांसह प्रवाशांचा प्रवास या खड्ड्यांनी खडतर होताना दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांना ठिगळ लावायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसह राज्यमार्गावरील खड्डे पुन्हा डोके वर काढायला लागले आहेत. भुईबावडा ते मांगवली व उंबर्डे ते वैभववाडी या रस्त्यांवर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होतील का? हा प्रश्न खड्ड्यांनाही पडत आहे. दरवर्षी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो.
परंतु कामेच निकृष्ट दर्जाची होत असल्याने रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत जाते. यावर्षी तर पावसाने सगळीकडेच हाहाकार माजवल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण करून टाकली आहे. गेल्या आठ दिवसापासून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसत आहे.

7

4