नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केसरकर यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा

2

अमित सामंत : उमेदवरीबाबत पक्ष घेणार निर्णय

वेंगुर्ले : ता.२०: सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात जी भूमिका घेतली त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच पाठींबा राहील. मात्र त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याएवढा मी मोठा नाही, त्या बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मी नाही असा खुलासा राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज वेंगुर्ले येथे बोलताना केला. तसेच एम.के.गावडे यांना उमेदवारी मिळावी ही सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे ती मी पक्षाकडे कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ले येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा महिलाध्यक्ष नम्रता कुबल, जेष्ट नेते एम.के.गावडे, बाळ कनयाळकर, भास्कर परब, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, प्रसाद पोईपकर, सावळाराम अणावकर, डॉ. संजीव लिंगवत, योगेश कुबल, युवक अध्यक्ष रोहन वराडकर, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच विधानसभा निवडणूक लढविणार आहे. दरम्यान बबन साळगावकर यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी या साठी मागणी केली आहे, त्या बाबत मी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. तो निर्णय पक्षाचा आहे.
या तालुक्यासह जिल्ह्यात काम करीत असताना पक्षशिस्तीला प्राधान्य देऊन पक्ष वाढविणार असे श्री. सामंत यांनी सांगितले.

32

4