झाराप गावातील रिक्त पोलीस पाटील पद भरा…

2

सरपंच स्वाती तेडोलकर यांची तहसीलदारांकडे मागणी…

कुडाळ ता.२०: झाराप गावामध्ये पोलीस पाटील रिक्त असल्याने या ठिकाणी पोलीस पाटील द्यावा अशी मागणी सरपंच स्वाती तेडोलकर यांनी तहसीलदार आर.व्ही.नाचणकर यांच्याकडे केली
कुडाळचे तहसीलदार म्हणून आर व्ही नाचणकर यांनी मंगळवारी तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला श्री नाचणकर हे यापूर्वी उपविभागीय अधिकारी (महसूल) रत्नागिरी या कार्यालयात नायब तहसीलदार (शिरस्तेदार )म्हणून कार्यरत होते त्यांची पदोन्नतीने कुडाळ तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेली आहे यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे मच्छिंद्र सुकटे याची बीड जिल्ह्यात
उपजिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन अधिकारी )निवड झाल्याने तहसीलदार पद काही दिवस रिक्त होते श्री नाचणकर यांनीपदाचा कार्यभार स्वीकारला झाराप शिष्ट्यमडळाने सरपंच सौ तेडोलकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्याचे स्वागत करण्यात आले पोलीस पाटील बाबत येत्या चार दिवसात कार्यवाही होईल तहसीलदार श्री नाचणकर यांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर विजय वराडकर ,तुकाराम वाघाटे,प्रल्हाद वराडकर,सावित्री वराडकर,दशरथ वराडकर,दिलीप वराडकर,बंड्या बोभाटे,बाळा राऊळ उपस्थित होते

11

4