शिवसेनेला संपविण्याची भाषा करणाऱ्यांनाच जनतेने जागा दाखवली…

2

नागेंद्र परब; निवजे ग्रामपंचायत सदस्य व बिब्याचीवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

कुडाळ ता.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष औषधाला देखील शिल्लक ठेवणार नाही अशी वल्गना करणाऱ्यांना याच सिंधुदुर्ग वासियांनी योग्यती जागा दाखवली,असे टीका शिवसेना जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी निवजे येथे केली.निवजे येथील ग्रामपंचायत सदस्य व बिब्याची वाडी ग्रामस्थ यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम खासदार श्री. विनायक राऊत यांची कन्या कु.रूची राऊत व जिल्हा परिषद शिवसेना गटनेते श्री. नागेंद्र परब यांच्या उपस्थितीमध्ये झाला निवजे गावातील गेल्या पाच वर्षातील झालेल्या विकास कामांच्या धडाक्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सौ. गीतांजली पालव व बिब्याच्या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. कु. रुची राऊत यांनी ग्रामपंचायत सदस्य सौ.गीतांजली पालव यांचे पक्षांमध्ये स्वागत करून त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते श्री. नागेंद्र परब यांनी शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा नेहमी सन्मान केला गेला आहे. पक्षामध्ये यापूर्वी प्रवेश घेतलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मानाची पदे मिळाली असून सर्वजण पक्षवाढीसाठी एकोप्याने काम करीत आहेत. या पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष औषधाला देखील शिल्लक ठेवणार नाही अशी वल्गना करणाऱ्यांना याच सिंधुदुर्ग वासियांनी जमिनीमध्ये गाडून टाकले आहे. कारण शिवसेना हा बाळासाहेब यांच्या सारख्या अवतारी पुरुषाच्या पुण्याईने स्थापन झालेल्या पक्ष असल्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये खासदार विनायक राऊत ,.ना. पालकमंत्री श्री. दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या अनेक विकासाच्या कामांमुळे अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. व आगामी विधान सभेच्या निवडणुकीपर्यंत उर्वरित सर्व शिवसेना पक्षांमध्ये दाखल होणार आहेत.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. व सर्व प्रवेश कर्त्यांचे पक्षांमध्ये स्वागत करून त्यांचा यथोचित मान सन्मान राखला जाईल असे सांगितले .प्रवेशकर्त्यामध्ये ग्रामपंचायत सद्स्या – गितांजली पालव
विट्ठल गवळी विनोद पालव
अमित पालव लक्ष्मण पालव विनोद सावंत वासुदेव सावंत दिगम्बर सावंत
भाऊ सावंत भास्कर पालव
सुरेश पालव सुहास पालव अमरेश पालव
अनिल पालव गोपाल पालव
लक्ष्मण चव्हाण अशोक राऊळ महादेव गवळी विट्ठल पालव गणेश पालव
अर्जून पालव चंदन पालव
राकेश कदम लक्ष्मण कदम
भाग्यश्री पालव दीपक कदम
बापू वाघे समीर पालव
सुचीत पालव वैशाली सावंत
सुमित्रा पालव सुनीत पालव
विजय पालव ममता सावंत
महानंदा गवळीअनिशा केदारे लक्ष्मी कदम भाऊ कदम साईनाथ चव्हाण बाबु घोगले
शांताराम रावूल राधबाई पालव
राधिका कदम विशाखा कदम
आरती घोगले वैश्णवी सावंत
अन्नपूर्णा पालव प्रमोद चव्हाण
जगन्नाथ चव्हाण अनिल चव्हाण
सुवासिनी चव्हाण यांचा समावेश आहे
.यावेळी उपविभाग प्रमुख श्री नरेंद्र राणे, शाखा प्रमुख श्री.संतोष पिंगुळकर,उपशाखा प्रमुख,माजी सरपंच महेंद्र पिंगुलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

22

4