वेंगुर्लेतील कुस्ती स्पर्धेत मदर तेरेसा स्कुलच्या विध्यार्थ्यांचे यश

2

वेंगुर्ले.ता.२०:वेंगुर्ला-कॅम्प येथे कुस्ती स्पर्धेत मदर तेरेसा मधील कु. तन्मय नितीन पाटील याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम, कु. वेदांशू बाळा आरावंदेकर याने १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम, तर कु. नित्यानंद सुदेश वेंगुर्लेकर याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

या तिन्ही विजेत्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या विजेत्यांना क्रीडा शिक्षक संदेश रेडकर व किशोर सोन्सुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक अॅन्थोनी डिसोजा यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

13

4