राणेंचा भाजपमधील प्रवेश स्वतःच्या स्वार्थासाठी

110
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संदेश पारकर यांची कणकवलीत टीका: पक्षनेतृत्व राणेंना भाजपमध्ये घेणार नाही

कणकवली, ता.२०: खासदार नारायण राणे हे स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या येण्याने भाजपचा कोणताही फायदा होणार नाही. तर राणेंचाच वैयक्तिक फायदा होणार आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये घेणार नाही असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज येथे केले.
श्री.पारकर यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, परशुराम झगडे, महेश सावंत आदी उपस्थित होते. श्री.पारकर म्हणाले, कणकवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निकालाचे चित्र पाहता येथे भाजपचा उमेदवारच निवडून येणार आहे. दुसरीकडे राणेंचा सातत्याने पराभव होत आहे. त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे ते भाजपत प्रवेश करणार असे सांगून कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत.
ते म्हणाले, राणे हे आता राज्यस्तरीय नेते राहिलेले नाहीत. तर कणकवली पुरतेच मर्यादीत राहिले आहेत. त्यांनी राजकारणात स्वतःचा आणि कुटुंबाचाच फायदा पहिला तर कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडले आहे. राणेंचे आजवरचे राजकारण गुंडगिरीचे राहिले आहे. आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी गुंड बनविले आहे. गुंडगिरी ही भाजपची परंपरा नाही. त्यामुळे राणेंच्या प्रवेशाला आमचा तीव्र विरोध आहे. तसेच पक्षनेतृत्व देखील राणेंना भाजपमध्ये घेणार नाही.

\