Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआंबोली- गेळे कबूलायतदार गावकर प्रश्नी पालकमंत्र्यांकडून धुळफेक...

आंबोली- गेळे कबूलायतदार गावकर प्रश्नी पालकमंत्र्यांकडून धुळफेक…

ग्रामस्थांचा आरोप: केवळ घोषणा,तसा कोणताही जीआर नसल्याचे म्हणणे…

सावंतवाडी ता.२०: पंधरा दिवसात आंबोलीतील कबुलायतदारगावकर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना आज चाळीस दिवस उलटले,तरी तो प्रश्न सुटला नाही.तसा कोणताही जीआर शासनाकडून आपल्याला प्राप्त झाला नाही.चिपी विमानतळावर गणपती उतरून जशी त्यांनी जनतेची दिशाभूल केली.तशीच परिस्थिती त्यांनी कबूलायतदार गावकर प्रश्नी केली आहे.असा आरोप आंबोली ग्रामस्थांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

हा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.दोन वर्षांपूर्वी श्री.तेली यांनी घेतलेल्या महसूलमंत्र्यांच्या बैठकीत श्री.केसरकर उपस्थित राहिले नाहीत.तेव्हा त्यांच्यातील स्वाभिमान जागा झाला होता.त्यांना याचे श्रेय स्वतःकडे ठेवायचे होते.मात्र आता विधानसभेच्या तोंडावर आपण हा प्रश्न सोडवला असे जाहीर करून ते पुन्हा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी जाहीर केलेला कोणताही शासनाचा जीआर अद्याप आला नाही.त्यामुळे केसरकर यांचा हा डाव आम्ही आंबोली-गेळे ग्रामस्थ उधळून लावू असाही इशारा यावेळी त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments