Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्ह्यात सहा उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार नियुक्त

जिल्ह्यात सहा उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार नियुक्त

धुदुर्गनगरी / प्रतीनिधी

जिल्ह्यात सहा उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण १० पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील महत्वाच्या अशा सर्व पदांना अधिकारी सापडले आहेत.

सिंधुदुर्ग महसुल विभागात सहा उपजिल्हाधिकारी आणि चार तहसीलदार अशी एकूण दहा पदे भरण्यात आली आहेत. सिंधुदुर्गात तब्बल सहा उप जिल्हाधिकारी पदे भरण्यात आली आहेत. यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून दादासाहेब गीते, रोजगार हमियोजना उपजिल्हाधिकारी पदी प्रशांत पानवेकर, भुसंपादन अधिकारी (मुख्यालय) वर्षा शिंगन, भुसंपादन इमारत व दळणवळण अधिकारी म्हणून डि एस ढगे, कुडाळ प्रांताधिकारी पदी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी पदी वैशाली राजमाने अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सहा उपजिल्हाधिकारी पदांबरोबरच चार तहसिलदार पदेही भरण्यात आली आहेत. यात कुडाळ तहसीलदार म्हणून रविंद्र नाचणकर, दोडामार्ग मोरेश्वर हाडके, कणकवली आर जे पावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल तहसीलदार म्हणून अमोल पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वांना पदोन्नतिने वरील पदी नियुक्त्या मिळाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments