वीज समस्येबाबत ओरोस ग्रामस्थ आक्रमक

2

वीज कार्यालयात दिली धडक

सिंधुदुर्गनागरी / प्रतिनिधी

ओरोस परिसरात भेडसावणाऱ्या वीज प्रश्नांच्या समस्यांबाबत ग्राप सदस्य अमित भोगले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ओरोस येथील वीज वितरणाच्या उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्यात आला. तसेच वाढीव बिले कमी करून दिली जात नाहीत तोपर्यंत बिले भरणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.

ओरोसमधील सर्व ग्रामस्थांना वीजेबाबत खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार वीज खंडीत होते. त्यामुळे ग्रामस्थांना वीजेचा तुटवडा जाणवत आहे. तसेच वीजेचे चालू रीडिंग न घेता काढण्यात येणारी बिले, तसेच अनियमितपणे येणारी वीज बिले, अपेक्षा नसताना येणारी भरमसाठ वीज बिले अडचणींचा सामना ग्रामस्थ तसेच व्यापारी यांना करावा सामोरे लागत आहे. वीज संदर्भात वारंवार होणारे अडचणी लक्षात घेऊन आज ओरोस ग्राप सदस्य अमित भोगले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ओरोस येथील विज वितरणच्या कार्यालयावर धडक दिली. उप कार्यकारी अभियंता किरण महेन्द्रेकर यांना याबाबत जाब विचारला. यावेळी ग्रामस्थ द्वारकानाथ डिचोलकर, परशुराम परब, महादेव परब, सागर परब आदि उपस्थित होते. यावेळी वाढीव बिले कमी करून दिली जात नाहीत तो पर्यंत बिले भरणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.

2

4